सुशिलाबाई पाटील यांचे निधन;7 रोजी अंत्ययात्रा!

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवाशी सुशिलाबाई माधवराव पाटील(काटे) यांचे 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता कोळपिंप्री येथे राहत्या घरापासून निघणार आहे.
त्या माजी सरपंच माधवराव डिगंबर पाटील यांच्या पत्नी व ग्रामपंचायत सदस्य तथा चायना मोझॅकचे संचालक दिपक काटे यांच्या आई होत.