कलावंतांचा न्याय, हक्कासाठी सदैव कटीबद्ध!-आ.चिमणराव पाटील

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा तालुका बँड पथक संघटना व महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची यांचा संयुक्त विद्यमाने पारोळा येथील नवनाथ मंदीरात आज रोजी संपन्न झाला. याप्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गायक सोमनाथ गायकवाड, प्रदेश सचिव शा.चत्रु आव्हाड, जळगांव जिल्हाध्यक्ष संगिताताई लाड, नाशिक जिल्हाध्यक्ष अभिनेते रमेश जाधव, शा.परशुराम सुर्यवंशी, ठाणसिंग वाघ, जळगांव जिल्हा प्रतिधीनी सागर पवार, मनिलाल ठाकरे, अनिल सुरेश ठाकरे यांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेतली. यासमयी आमदार चिमणराव पाटील यांची नुकतीच जळगांव जिल्हा बँकेचा संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल व आयोजित कार्यक्रमाला अनमोल सहकार्य लाभल्याबद्दल संघटनेतर्फे आभार व्यक्त करून अभिनंदन करण्यात आले. तसेच कलावंतांचा न्याय हक्कासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला असुन कलावंतांचा विविध समस्यांबाबत सहकार्य करण्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांना सांगितले. यावर आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले कि, मतदारसंघातील कलावंत, दिव्यांग यांच्या न्याय हक्कासाठी सदैव कटीबद्ध असुन मतदार संघातील कलावंत व दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्यांबाबत थेट माझ्याशी संपर्क करावा.