जागतिक टपाल दिनानिमित्त उपडाकपाल यांचा केला सत्कार!

पारोळा (प्रतिनिधी) जागतिक टपाल दिनानिमित्त येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी उप डाकघर कार्यालयात स्वत: जाऊन उप डाकपाल जे.डी.ठाकुर यांचा शाल, श्रीफळ,पुष्पहार मिठाई व शुभेच्छा पत्र देऊन भावपूर्ण सत्कार करुन सर्व कार्यालयीन व गृप डी कर्मचारी आणि पोस्टमन यांना मिठाई वाटपही केली.
सदर प्रसंगी उप डाकपाल श्री ठाकुर व टी. एस्. पाटील यांनी भावसार सरांबद्दल आदर व्यक्त करुन आभार मानले !
भावसार सर यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल शहरात आनंद व्यक्त केला जात आहे.