अमोल पाटील यांनी अमळनेर मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी घ्यावी; पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची मागणी

0

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्या साठी शहरातील जुना टाऊन हॉलमध्ये झालेल्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची बैठक आयोजित केली होती.यावेळी अमळनेर मतदारसंघात भविष्यात शिवसेनेचा आमदार व्हावा,त्यासाठी जे.डी.सी.सी.चे संचालक तथा पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांनी लढवावी,अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी केली.
अमळनेर मतदारसंघात पारोळा तालुक्यातील 42 गावे आहेत ,त्यात शिवसेनेचे वर्चस्व आहे,त्यासाठी युवा नेतृत्व आवश्यक असून अमोल पाटील योग्य आहेत,त्यासाठी त्यांनी संपर्क वाढवावा,अशी मागणी झाली.त्यावर अमोल चिमणराव पाटील यांनी आपल्या मनोगतात पदाधिकारी यांनी जो विश्वास व्यक्त केला त्याला बद्दल धन्यवाद दिले, पण एरंडोल,पारोळा मतदार संघात संपर्क सुरु असून सामाजिक व वैद्यकीय मदत सुरू असल्याचे सांगितले.पक्षासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील,असे आश्वासन दिले.
बैठकीचे अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ होते.
येत्या येणाऱ्या नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत अंमळनेर तालुक्यात शिवसेनेची जास्तीत जास्त उमेदवार कसे विजयी होतील,यासाठी प्रयत्नशील राहून संपूर्ण तालुक्यात आपल्या पक्षाचे आपल्या पक्षाचे संघटन वाढवण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी केले. यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले.
जुने नवे असा भेदभाव न करता सर्व शिवसैनिकांनी एकमेकांना विश्वासात घेऊन तालुक्यात संघटन वाढवून प्रत्येक संस्थेमध्ये आपले लोक, आपले लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी मेहनत घ्यावी असा सल्ला सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिला.यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील यांनी युवासेना तालुक्यातील व शहरातील प्रत्येक भागात कार्यरत करावी असे सांगून लागेल ती मदत देऊ असे सांगितले.
यावेळी कारभारी आहेर,जि.प.सदस्य रोहिदास पाटील,तालुकाप्रमुख विजू मास्तर, तालुका संघटक महेश देशमुख माजी तालुकाप्रमुख नाना ठाकोर,दादा पवार शिवकुमार पाटील,अनंत निकम, युवती सेना प्रमुख जयश्री बैसाणे,उमेश अंधारे,चंद्रशेखर भावसार,सुरज परदेशी,दीपक हटवाल,रामचंद्र पाटील,विश्वास महाराज आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी महिला जिल्हा उपप्रमुख मनिषा परब,शहर प्रमुख संजय पाटील,युवासेना उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील,नगरसेवक प्रताप शिंपी, नगरसेविका रत्नमाला महाजन, संजय पाटील, सुरेश पाटील,संगीताबाई शिंदे,उज्वलाताई कदम,किशोर पाटील,अमर पाटील,किसन पाटील,विलास पाटील, शिवाजी पाटील,रमेश पाटील, प्रेमानंद पाटील,बी.एन.पाटील,देवेंद्र देशमुख,अनिल बोरसे,ज्ञानेश्वर पाटील,मोहन भोई, जिवन पवार,नाना राऊळ,साखरलाल महाजन, भोला टेलर,विजय पाटील,डॉ.सतीश धनगर, सोमा नाईक,धनराज भिल,नवल पाटील,एसटी सेनेचे आर डी पाटील,दिनेश सोनवणे,नितीन पाटील,बी.ओ.पाटील,काशीराम चौधरी,शेखर पाटील,बाबू परब, महिला सेनेच्या कलाबाई पाटील, सोनुबाई सोनवणे, वाडकर ताई, सिंधुबाई पाटील,यांच्यासह शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे यांनी केले,तर आभार चंद्रशेखर भावसार यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!