निंभोरा येथे सामाजिक सभामंडप बांधकाम भूमिपूजन व रस्ता काँक्रीटीकरण लोकार्पण!

अमळनेर (प्रतिनिधी) मतदार संघातील निंभोरा येथे ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा योजनेअंतर्गत सामाजिक सभामंडप बांधकामांचे भूमिपूजन आणि रस्ता काँक्रीटीकरण लोकार्पण माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी गावकऱ्यांनी तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी मा.आ.शिरिष चौधरी यांचे ढोल ताश्याच्या गजरात स्वागत केले. सर्वप्रथम या प्रसंगी मा आमदार यांनी ग्राम दैवत महादेवाच्या चरणी पुष्प अर्पण करून भूमिपूजन कार्यक्रमांची सुरुवात केली.
मनोगत व्यक्त करताना मा.आमदार असे बोलले की, माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात तसेच माझ्या शिफारशी च्या माध्यमातुन मंजूर झालेले सामाजिक सभामंडपाचे (10 लक्ष) भूमिपूजन तसेच आपल्या गावात झालेल्या रस्ता काँक्रीटीकरणाचे (10 लक्ष) लोकार्पण आले असे व्यक्त करण्यात आले याबरोबरच संपूर्ण मतदारसंघात बरीच कामाची भूमिपूजन तसेच लोकार्पण बाकी आहेत ते ही येणाऱ्या काही दिवसात योग्य नियोजनाने करू असेही ते बोलले. या बरोबर या आधी पंचक्रोशीत खूप आणि समाधानकारक कामे झाली याबाबत जनता खुश आणि आशीर्वाद मला देताय याचा मला सार्थ अभिमान आहे असेही नमूद केले.
याप्रसंगी अनिल महाजन,मा उपनगराध्यक्ष न.प.अमळनेर,किरण गोसावी व्हा.चेअरमन राजमाता जिजाऊ सूतगिरणी, हरेश्वर पाटील महाळपुर सामाजिक कार्यकर्ता,गणेश गुरव मा. उपसरपंच करणखेडा,आलेश धनगर उपसरपंच निभोरा ग्रा. प.,जितेंद्र वाडेकर ग्रा.प.सदस्य सुभाष पारधी, ग्रा प सदस्य सौ कविता कोळी ग्रा प सदस्य जेष्ठ नागरिक भालेराव पाटील,गोरख पाटील ,रमेश पाटील,भास्कर पाटील,योगराज पाटील यासह अरुण पाटील,रविंद्र दिवाण पाटील, रविंद्र पाटील ,रवींद्र कोळी ,रंगराव पाटील, पंडित पाटील,सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दीपक पाटील, देवराम धनगर,निंबा धनगर ,परमेश्वर पाटील,रविंद्र बाबूलाल कोळी,पंडित मिस्त्री, सुभाष पाटील, किरण पाटील, भूषण पाटील,बंटी कोळी,रोशन सोनवणे,विपुल भदाणे, प्रदीप पाटील, कल्पेश महाजन,यासह सर्व ग्रामस्थ या प्रसंगी हजर होते याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने रविंद्र पाटील यांनी मा.आ. शिरीष चौधरी यांचे आभार मानले