आ.चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी पारोळा तालुक्यासाठी २० हजार लसींचा पुरवठा होणार!

पारोळा (प्रतिनिधी) 26 सप्टेंबर रविवार रोजी पारोळा तालुक्यातील नागरिकांनी आमदार चिमणराव पाटील यांची भेट घेऊन लसीकरणाबाबत लसींचा पुरवठा होत नसल्याने अनेक नागरिक लसिकरनापासून वंचित असल्याची तक्रार केली होती. याची आमदार चिमणराव पाटील यांनी त्वरित दखल घेत जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी जमादार यांचेशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सदरील परिस्थिती लक्षात आणून दिली व पारोळा तालुक्यासाठी जास्तीत जास्त लसींचा पुरवठा करण्यात यावा अश्या सूचना केल्या. त्याच अनुषंगाने आरोग्य अधिकारी जमादार यांनी सोमवारी संध्याकाळ पर्यंत २०,००० लसींचे डोस उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले.