तालुक्यातील शेतकरी वर्गाला त्वरीत ई पीक पाहणी लावणेचे तहसीलदार अनिल गवांदे यांचे आवाहन

▶️ ई पीक पाहणी भरणेसाठी शेवटचे 7 दिवस मुदत.
पारोळा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्ट पासुन ई पीक पाहणी हा शेतकरी हितासाठीचा महत्वाकांशी प्रकल्प हाती घेतला असुन गेल्या महीन्यापासुन संपुर्ण महसुल विभाग याची जोमाने प्रचार प्रसिध्दी व प्रबोधन करीत आहे.15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या कालावधीत पीक पाहणी लावणे गरजेचे असते.शेतकरी वर्गास आपले उत्पन्न विक्रीसाठी त्या पीकाची नोंदणी 7/12 वर असणे गरजेचे असते.पीक कर्ज,अनुदान,पीक विमा व तत्सम बाबींसाठी चालु वर्षाची पीक पाहणी 7/12 वर होणे गरजेचे असते परंतु वारंवार सुचित करूनही बरेच शेतकरी बांधवांनी अजुनही पिक पाहणी दाखल केलेली नाही.गावागावात तलाठी यात येणाऱ्या अडचणी सोडवित आहेतच पण पारोळा शहर तलाठी निशिकांत माने हे फोन वरून बरेच शेतकरी वर्गास मार्गदर्शन करीत आहेत.तरी सर्व शेतकरी बांधवांनी शेवटच्या दिवसाची वाट न पहाता आपली पीक पाहणी त्वरीत दाखल करावी जेणे करून आपण शासनातर्फे मिळणाऱ्या योजनांना मुकावे लागणार नाही.असे आवाहन पारोळा तहसिलदार अनिल गवांदे यांनी केले आहे.