मल्हार कुंभार,राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

मालेगाव (प्रतिनिधी) प्रजाराज्य न्यूज
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्य स्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व टेंभे ग्रामपंचायत ता.बागलान यांच्या तर्फे राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार 2020 चे आयोजन मालेगाव करण्यात आले होते.यावेळी तुषार शेवाळे अध्यक्ष व्ही.पी.संस्था नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली व दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष संगमनेर भाऊसाहेब चिला अहिरे,आदर्श सरपंच, टेंभे ग्रामपंचायत,अतुल निकम,संचालक नेहरू युवा केंद्र कर्नाटक यांच्या उपस्थितीत मल्हार कुंभार यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जिल्ह्यात VMK एंटरप्राईजेस व भावेश पोल्ट्री फार्म या मार्फत शेतकरी मार्गदर्शन केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना 22 पोल्ट्री फार्म केले तसेच शेळीपालन, बटर पालन,मच्छी पालन या उद्योगांचे मार्गदर्शन करत असतात तसेच त्यांचा गावात व तालुक्यात विविध सामाजिक कार्यात सहभाग असतो. आतापर्यंत त्यांना 11 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.अशा वेगवेगळ्या माध्यमातून नेहमी आपले योगदान देत असतात याची नोंद धुळे निसर्ग समितीचे संस्थापक प्रेम कुमार आहिरे यांनी घेतली व मल्हार कुंभार यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.