दिपक चतुर गिरासे यांची ज.जि.प्रा.शि.स. सोसायटी वर स्वीकृत संचालक पदी निवड!

0

पारोळा(प्रतिनिधी) जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी मर्यादित पतसंस्था जळगांव मुख्य शाखा पारोळा येथे प्राथमिक शिक्षकांची संचालक पदी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर जे पाटील (राज्यउपाध्यक्ष- शिक्षक संघ मुंबई )हे होते तर प्रगती गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, पारोळा संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती.भारतीताई पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी धीरज सुकलाल पाटील अंमळनेर, सचिन पाटील-चाळीसगांव, भागवत हडपे चाळीसगांव या तिघांची रिक्त संचालक पदी निवड करण्यात आली,तर तज्ञ संचालक म्हणून
दिपक चतुर गिरासे-पारोळा व राजेंद्र भीमराव पाटील-पाचोरा यांची निवड करण्यात आली,या कार्यक्रमात प्रगती गट अध्यक्ष ग.स.सोसायटी रावसाहेब मांगो पाटील, राजेंद्र सांळुखे, मगन पाटील, समाधान पाटील, विजय पवार, ए टी पवार, योगेश सनेर, सी एम चौधरी , विपीन पाटील, निलेश पाटील, गोकुळ पाटील, महेंद्रसिंग सीसोदे, एकनाथ पाटील, नाना पाटील,प्रशांत पाटील,जयप्रकाश सूर्यवंशी, सचिन पाटील,अनिल.भा.पाटील,अनिल चौधरी, सिद्धार्थ सरदार, अरुण पाटील, अन्ना चौधरी, नरेंद्र पाटील,राजू पाटील, सचिन देशमुख, गोपाल पाटील,सखाराम जावरे,शरद वाणी, अविनाश शिंपी, भटेसिंग गिरासे, ईश्वर धोबी यासह पारोळा तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, पारोळा पश्‍चिम सोसायटीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सन्माननीय संचालक मंडळ जिल्ह्यातील पदाधिकारी व पारोळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
दिपक चतुर गिरासे यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक गिरासे यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र सोनवणे व आभार जयप्रकाश सूर्यवंशी यांनी मानलेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!