स्व.बापूसो प्रतापराव काटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण व रक्तदान

अमळनेर (प्रतिनिधी) येथील शिवशाही फाऊंडेशनचे मार्गदर्शक, अमळनेर फ्रूटसेल सोसायटीचे संचालक तथा आदर्श शिक्षक स्वर्गीय बापूसो. प्रतापराव राजाराम काटे यांच्या प्रथम स्मृतिदिन सामाजिक संदेश देणाऱ्या उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरणीय संदेश तर कोविड काळात आवश्यक असे रक्तदान करून एक अनोखा संदेश देण्यात आला.


स्व.बापूसाहेब प्रतापराव काटे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शिवशाही फाऊंडेशनच्या कार्यालयात प्रतिमा पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य विस्तार अधिकारी प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्व.प्रतापराव काटे यांच्या जीवनपट उलगडून दाखविला. यावेळी नंदलाल चौधरी, यशोदीप सोनवणे, जयेशकुमार काटे, उमेश काटे, प्रथमेश सोनवणे, वैशाली सोनवणे, निलिमा पाटील, गायत्री काटे, निकिता काटे, जागृती काटे, शाहूराजे काटे, दक्षता काटे आदी उपस्थित होते. दरम्यान येथील एस.के पाटील नगर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. रक्तदान ही काळाची गरज म्हणून जीवनश्री रक्तपेढीत रक्तदानही करण्यात आले. यावेळी जयेशकुमार काटे, चंद्रकांत पाटील, शरद पाटील, संदीप ढोले, उमेश काटे, टि.के.पावरा, शिवाजी पाटील, प्रथमेश सोनवणे,सागर पावरा,शाहूराजे काटे,चिरायू ढोले आदी उपस्थित होते.

