अमळनेर येथे खाजगी प्राथमिक शिक्षकांची बैठक संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) येथे महाराष्ट्र टीचर असोसिएशनच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील (सूर्यवंशी) यांच्या सोबत अमळनेर खाजगी प्राथमिक शिक्षकांसोबत बैठक संपन्न झाली यात शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विवेक सूर्यवंशी, शिरीषराव धनगर (संघटन मंत्री मल्हार सेना) जळगाव खाजगी प्राथमिक शिक्षकांची पतपेढीचे संचालक कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्यात बैठक संपन्न झाली.
या बैठकीत शिक्षकांना जूनी पेंशन लागू करावी तसेच TET धारक शिक्षकांचे वेतन कसे सुरू करता येईल तसेच सर्व शिक्षकांचे वेतन १ते ५ या तारखेच्या आत नियमित व्हावे तसेच 20℅अनुदान असणाऱ्या शाळांना प्रचलित अनुदान मिळावे या सारख्या विविध मागण्याच्या संदर्भात शुभांगी ताईना निवेदन देऊन त्यावर सकारात्मक चर्चा झाली.त्या संदर्भात ताईंनी जुनी पेशन लागू करण्यासाठी व इतर मागण्यासाठी मी शेवटपर्यंत लढा देऊन त्यापूर्ण केल्या शिवाय राहणार नाही,अशी हमी सर्व उपस्थित शिक्षकांना दिले.तसेच १ते५ तारखेच्या आत शिक्षकांचे वेतन कसे करता येईल त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून ही अडचण लवकरात लवकर सोडवू असे वचन ही ताईंनी सर्व शिक्षकांना दिले. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर सर्व शिक्षकांमध्ये एक नवीन चेतना निर्माण झाली एक आपल्या हक्काचे नेतृव आम्हास मिळाले असे सर्वांनी ताईंना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना नरेंद्र आहिरराव यांनी केले.सुत्रसंचालन बापूराव ठाकरे यांनी केले. शुभांगी पाटील यांचा सत्कार व स्वागत कैलास पाटील यांनी केले आणि मकरंद निळे यांनी आपले विचार मांडले.आभार श्री कैलास पाटील यांनी केले.यावेळी शिक्षक प्रतिनिधी अनंत कुमार सुर्यवंशी , जितेंद्र बेडसे अमळनेर तालुका अध्यक्ष आशिष पवार जुनी पेंशन तालुका अध्यक्ष जयेश सिरसाठ ,अनिस खाटीक आणि अमळनेर शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी सुरेश पवार (लिपिक ) उपस्थित होते. र.सा.पाटील प्राथमिक विद्या मंदिर अमळनेर येथे कार्यक्रम संपन्न झाला. तालुक्यातील इतर शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उपस्थिती होते
