प्रवेशद्वारा जवळ अपघात थांबविण्यासाठी युवासेनेचे रास्ता रोको आंदोलन

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील धुळे रोड वरील प्रवेशद्वारावर ४० ते ५० अपघातास कारणीभूत ठरलेल्या व संथगतीने काम करणाऱ्या ठेकेदारा विरुद्ध तातडीने काम पूर्ण करावे यासाठी युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्रीकांत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रवेशद्वारा जवळच रास्ता रोको आंदोलन केले.
शहरासाठी आकर्षण ठरणारे प्रवेशद्वार ठेकेदाट्रक्सच्या नियोजना अभावी मृत्यूद्वार ठरणाऱ्या प्रवेशद्वारावर रिफलेक्टर न लावणे , वळण मार्गाचे फलक न लावणे , तात्पुरत्या स्वरूपात लावलेली कच्ची बॅरॅकेटिंग वारंवार तुटून जात असल्याने वाहनचालकांना प्रवेशद्वार जवळील अडथळे दिसत नसल्याने आजतागायत तब्बल ४० ते ५० अपघात झाले आहेत.संबंधित ठेकेदाराने ४ ते ५ दिवसात काम पुर्ण न केल्यास त्यांची विलंबा बाबत सखोल चौकशी करावी व ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधित ठेकेदारावर बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकारीची अवकृपा आहे व हेतुपुरस्कर दुर्लक्ष का करीत आहे याची चौकशी व्हावी अश्या मागणीसाठी युवा सेनेने आज आक्रमक पवित्रा घेत रास्तारोको आंदोलन केले.त्यानंतर तहसीलदार ,पोलीस निरीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग याना निवेदन दिले यावेळी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी ,उमेश अंधारे , अनंत निकम ,अमर पाटील,मयूर पाटील,हर्षल ठाकुर यांनी घोषणा देत वाहतूक रोखली होती. सुमारे पाऊण तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे ,पोलीस नाईक डॉ शरद पाटील, हेडकॉन्स्टेबल संजय पाटील ,यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

