स्टॅण्ड अप इंडिया योजनेचा अनुसूचित जातीतील नव उद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन

0

जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 8 मार्च, 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांनी एकूण प्रकल्प किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व अर्जदारास बँकेने स्टॅण्ड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर 15 टक्के रक्कम राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. अर्जदारास स्टॅण्ड अप योजनेतंर्गत बँकेने कर्ज मंजूर केलेले असावे.
या अटींची पूर्तता करीत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नव उद्योजक व नव उद्योजिकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मायादेवी मंदिराजवळ, महाबळ रोड, जळगाव यांचे कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे आवाहन योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!