वडगाव प्र.अ.येथे रस्ता काँक्रीटीकरणाचे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

0

अमळनेर (प्रतिनिधी)अमळनेर विधानसभा मतदार संघातील वडगाव प्र.अ.(ता.पारोळा) येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा भुमिपूजनाचा सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला.अंदाजित ५ लक्ष रुपये निधी या कामासाठी खर्च केला जाणार असून,यामुळे नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, पारोळा पं.स.उपसभापती अशोक पाटील,वडगाव ग्रा पं सदस्य संभाजी पाटील,जिराळी सरपंच सुनिल पाटील,सुमठाणे सरपंच अविनाश पाटील,अंबापिंप्री सरपंच मनोहर माळी,जिराळी उपसरपंच मधुकर सोनवणे,सुमठाणे उपसरपंच भैय्यासाहेब पाटील,जिराळी मा.सरपंच भिकन पाटील, पिंपळकोठा मा.उपसरपंच प्रविण पाटील, ग्रा पं सदस्य ज्ञानेश्वर पाटील, निंबा पोपट पाटील,वामन पाटील, सुभाष पाटील,आधार पाटील, बाबुलाल पाटील,दिलीप पाटील, अनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!