अमळनेर येथील साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे उंची वाढवून सुशोभीकरण करावे;विविध सामाजिक संघटनांची मागणी

▶️ बहुजन रयत परिषद व समता समितीचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील असलेल्या साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची उंची वाढवून सुशोभीकरण करावे या मागणीचे निवेदन दि 29 जून रोजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांना बहुजन रयत परिषद तर्फे देण्यात आले
या लेखी निवेदनात म्हटले आहे की, राज्य महामार्ग-6 चोपडा-अमळनेर-धुळे या रस्त्याचा हायब्रीट अॅम्युनीटीच्या अंतर्गत काम झाले . धुळे रोडवर असणाऱ्या साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकांची खूप मोठी दयनीय अवस्था झाली आहे,संबंधित
ठेकेदाराने हे काम करून सरळ पळ काढला आहे असे समजते त्या ठिकाणी काम करतांना ठेकेदाराने महापुरुषांची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र तेवढी तसदी संबंधित ठेकेदाराने व शासकीय अधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे. साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक जिल्ह्यात अमळनेर सोडून कोणत्याही ठिकाणी नाही. म्हणून अमळनेर येथील स्मारकास भेट देण्यासाठी अनेक बहुजन समाज बांधव येत असतात. परंतु या महापुरुषांच्या स्मारकाजवळ अशी अस्वच्छतेची घाण बघून समस्त बहुजन समाजाच्या भावना यामुळे दुखावल्या जात आहेत. साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे हे दलित समाजाचे असले तरी ते जागतिक दर्जाचे शाहीर , साहित्यीक, लेखक होते. परदेशात जाऊन महाराष्ट्राची कला त्यांनी जगासमोर मांडली आणि एवढे असुनही जर या महामानव पुरुषांचे अवमान होत असेल तर ही या पुरोगामी महाराष्ट्रासाठी खूप मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. यामुळे समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. या बाबत आपण दक्षता घ्यावी.तसेच येणाऱ्या 1 ऑगस्ट 2021 रोजी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी करण्यात येणार
आहे. त्यामुळे समाजाच्या भावनांची व अण्णाभाऊ यांनी पुरोगामी महाराष्ट्रासाठी केलेले कार्य हे लक्षात घेत आपल्या स्तरावर लवकरात लवकर स्मारकाची उंची वाढवुन स्मारकाचे सुशोभिकरण करावे अशी विनंती निवेदनामार्फत केली आहे या निवेदनावर बहुजन रयत परिषद चे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे,सल्लागार हरीचंद्र कढरे,खजिनदार नारायण गांगुर्डे, शहराध्यक्ष सुरेश कांबळे, समता समितीचे अध्यक्ष समाधान मैराळे, सदस्य लखन चंदनशिव,राजू कांबळे, शरद कढरे,दीपक गरुड आदी च्या स्वाक्षऱ्या आहेत