बीएसएफ चे अनुसचिवीय उपनिरिक्षक महेन्द्र पाटील यांना पोलीस सेवा अंतरिक सेवा पदक व सन्मानपत्र द्वारे सन्मानित

0

यावल ( प्रतिनिधी ) सुनील गावडे
नॉर्थ ईस्ट (मेघालय आणि त्रिपुरा) येथे जवळपास 4 वर्ष शांतता व सामान्य वातावरण राखण्याच्या दृष्टीने महानिदेशक, सीमा सुरक्षा बल (BSF) नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्वोत्तर च्या अती दुर्गम भाग असलेल्या मेघालय आणि त्रिपुरा येथे केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार सेवेच्या परिचालन उत्कृष्टतेवर आधारित उत्कृष्ठ सेवे करिता विरावली गावचे राहिवासी सध्या बीएसएफ मधे सहा. उपनिरीक्षक(अनुसचिवीय) पदावर तैनात श्री महेन्द्र पुंडलिक पाटील गांव विरावली तालुका यावल जिल्हा जळगाव यांचा श्री. राम अवतार, संयुक्त निदेशक /महानिरीक्षक, सीमा सुरक्षा बल टेकनपूर, राहणार ग्वालियर (मध्यप्रदेश )यांचे हस्ते संपूर्ण देशावर ओढवलेल्या कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारी संकट काळात कोविड 19 चे शिस्तीने काटेकोरपणे पालना केल्याबद्दल एक छोटे खानी कार्यक्रमात वरिष्ठाच्या हस्ते पोलिस अंतरीक सेवा पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या सम्मानाने विरावली गावातिल नागरिक व यावल तालुक्या करिता ही अभीमानाची गौरवास्पद आणी आंनदाची बाब आहे. या सम्मान सोहळाच्या कार्यक्रम प्रसंगी श्री.के.एल. शाह, (उपमहानिरीक्षक ) श्री. विक्रम कुंवर, (कमांडेंट ) श्री अरुण कुमार गंगवार, ( द्वितीय श्रेणी कमांडिंग अधिकारी )व अन्य महत्वाचे अधिकारीगण प्रामुख्याने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!