निम – मांजरोद पुलासाठी आ.अनिल पाटील यांना साकडे!

0

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील जिव्हाळ्याचा व दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला तापी नदीवरील नियोजित निम-मांजरोद पुल बांधन्यात यावा यासाठी आज रोजी आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निम्न तापी प्रकल्पावर , जलसिंचन विभागाकडे आधारीत असलेला हा निम-मांजरोद पुल शासनाच्या मागील काळात मंजूर झाला होता.मात्र पुरेश्या निधीअभावी हा पूल तापी पाटबंधारे महामंडळाने कायमचा रद्द केला आहे.
तापी नदीवर पूल झाल्यास या मार्गाने शिरपूर- सेंधवा- इंदोर या भागात जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे. पुल व्हावा ही अनेक वर्षांपासूनची तालुक्यातील नागरीकांची मागणी आहे. हा पुल झाल्यास तालुक्यातील दळणवळणाच्या सोयी वाढणार आहेत.
▶️ मंजूर पुल निधीअभावी रद्द
तापी पाटबंधारे महामंडळ अंतर्गत निम- मांजरोद पुलाला मंजूरी मिळाली होती.या अंतर्गत नीम ते मांजरोद अंतर्गत तापी नदीत मागील काळात अधिकाऱ्यांनी सर्वेही केला होता.यामुळे तालुक्यातील नागरिकांनी पुल होणार म्हणून समाधान व्यक्त केले होते. या पुलाच्या कामामुळे जळगाव धुळे ,शिरपुर,ते मध्यप्रदेश जाण्यासाठी मोठी सोय होणार असून अमळनेर तालुक्यात यामुळे दळन वळण्याच्या सोयी वाढनार आहेत. मात्र सदयस्थितित तापी पाटबंधारे महामंडळाने पुरेश्या निधीअभावी हा पुल कायमचा रद्द करण्यात आल्याने तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
निम-मांजरोद पुल हा तापी पाटबंधारे महामंडळ अंतर्गत न करता,सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करण्यात यावा त्यासाठी ठोस निधीची तरतूद करून कामाची सुरुवात करून जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा.यासाठी आमदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी कपिलेश्वर संस्थानचे सचिव मगन पाटील,संदीप घोरपडे, भागवत पाटील,प्रा.अशोक पवार,धार येथील गणेश पाटील,अलीम मुजावर,मारवड येथील उमाकांत पाटील भागवत,एस एम पाटील,आर पी चौधरी सर,तुकाराम पाटील,छोटु पाटील,अॅड राजेंद्र चौधरी,सुदाम पाटील आदी उपस्थित होते .

आमदार अनिल पाटील
शासनाकडे पाठपुरावा करून रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळवून
पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा या पंचवार्षीक मध्ये उदिष्ट आहे . व तो मी करेन असेही आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी यावेळी दिले .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!