ग्रामपंचायतीचा दंड भरण्यासाठी सरपंच महिलेने विकले आपले दागिने

0

▶️ दभाषी येथील सरपंच नंदीनी पाटील यांनी मंगळसूत्र व सोन्याच्या अंगठ्या विकून भरला महावितरणला दंड.

शिंदखेडा (प्रतिनिधी) तालुक्यातील दभाषी येथील ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याचा प्रकल्प सुरू केला होता त्याची तात्पुरता टेस्टींग करण्यासाठी ग्रामपंचायतीने वीज घेतली होती, त्यावर विरोधकांनी तक्रार केल्याने ग्रामपंचायतीला दंड ठोठावण्यात आला. तो दंड लोकनियुक्त सरपंच नंदीनी पाटील यांनी स्वतः मंगलसूत्र व २ दोन सोन्याच्या अंगठ्या विकून ८४ हजाराचा दंड भरला.
अनेक वर्षांपासून दभाशी गावात पिण्याचे पाण्यासाठी मोठी भटकंती ग्रामस्थांना करावी लागत होती. त्यावर मागील वर्षी प्रथम लोकनियुक्त सरपंच नंदिनी विकास पाटील यांनी माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या कडे पाठपुरावा करून नियमित पाणीपुरवठा करवून घेतला होता, ८ दिवसांनी येणारे पाणी आता दररोज येवू लागले होते. तसेच तग्रामस्थांना शुध्द आर. ओ. पाणी फिल्टर ५ मार्च २०२१ रोजी बसविण्यात आले. टेस्टींग साठी तात्पुरते पाणी फिल्टर चे वीज कनेक्शन आकडी टाकुन घेण्यात आले होते, पण विरोधकांनी त्याची तक्रार नाशिक व जळगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत् महामंडळाचे अधिकारींना करून कारवाई करावी अशी मागणी केली. त्यावरून २८/०५/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ नरडाणे येथील पथकाने पाणी फिल्टर व इतर ३ मोटरींचे पाण्याचे कनेक्शन कट करून दभाशी ग्रामपंचायत वर कार्यवाही करून ८४०८० रूपये इतका दंड ठोकण्यात आला.
या संकटाला तोंड देण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील वरीष्ठ ग्रामस्थांना बोलवण्यात आले व याविषयी चर्चा करण्यात आली त्या चर्चेतुन घरपट्टी व पाणीपट्टी गोळा करून दंड भरण्यात यावा असे ठरले त्या प्रमाणे गावात वसुली करण्यासाठी गेले असता सध्या गावातील बहुतांश ग्रामस्थांचा व्यवसाय शेतीवर अवलंबून असल्याने सध्या कुणाकडे पैसे नाहीत असे वसुलीत निदर्शनास आले. या दभाशी गावातील ग्रामस्थांना होत असलेल्या अवहेलना सरपंच नंदिनी विकास पाटील यांना पाहिले गेले नाही व त्यांनी स्वतःचे मंगळसुत्र व २ अंगठ्या विकून त्या पैशांनी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ८४०८० रू. इतका दंड भरण्यात आला व लवकरच दभाशी गावातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला.
दभाशी गावातील प्रथम नागरिक या नात्याने दभाशी गावातील समस्त ग्रामस्थांचे संकट हे आपले स्वताचे संकट समजून जी भूमिका घेतली त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!