धनगर समाजाने चांगले कार्य करणाऱ्या समाजबांधवांना सदैव प्रोत्साहन द्यावे -आ.अनिल पाटील

▶️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती निमित्त स्मारकस्थळी पूजन
अमळनेर/प्रतिनिधी /प्रजाराज्य न्यूज
महिलेला संधी, स्वातंत्र्य हीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शिकवण होती,त्यांनी केलेले कार्य चिरकाल राहील,त्यांनी कौशल्याने निर्माण केलेल्या वास्तू आजही शक्य नाही, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत राहा,चांगले कार्य करणाऱ्या महिला आणि समाजबांधवांना प्रोत्साहन द्या.धनगर समाजासोबत मी कायम असून समाजाच्या अडचणीं आपण सारे एकत्र राहून सोडवू अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील बस स्टँड जवळील स्मारकस्थळी मोजक्या समाजबांधवांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी आमदारांनी संवाद साधताना लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता यांच्या अथक प्रयत्नाने कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे,यापुढेही आपण असेच नियमांच्या बंधनात कायम राहिल्यास लवकरच आपण पूर्णपणे या झडपेटून बाहेर पडू असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला.यावेळी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे,अर्बन बँकेच्या संचालिका सौ वसुंधरा लांडगे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खा शी मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन,संचालक योगेश मुंदडा, नीरज अग्रवाल,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील,प्रा अशोक पवार,आरोग्य सभापती श्याम पाटील,सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील उपस्थित होते.कोविड प्रादुर्भावामुळे शासकीय नियम पाळत हा कार्यक्रम पार पडला,कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर धनगर समाज व राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले होते.यावेळी बन्सीलाल भागवत,नितीन निळे,मच्छीन्द्र लांडगे,एस सी तेले, प्रदीप कंखरे,प्रभाकर लांडगे, समाधान धनगर, प्रा दिनेश भलकार,प्रा गजानन धनगर, आनंदा हडप,रमेश देव तसेच डी ए धनगर,पंडित लांडगे,महादू लांडगे,दशरथ लांडगे,गोपाल हडपे,प्रा जी एल धनगर,पवन लांडगे,श्रीराम कंखरे,आनंदा धनगर,अविनाश अडगळे,ए के हडप,गोपींचंद शिरसाठ,आढावेकर,दीपक धनगर यासह समाजबांधव उपस्थित होते.अहिल्यादेवींचा जयघोष यावेळी करण्यात आला.