दिव्यांगांना घरपोच लसीकरण करण्याची दिव्यांग संघटनेची मागणी;आमदार चिमणराव पाटील यांनी घेतली दखल!

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यात मूक-बधिर,कर्ण-बधिर व अस्थीव्यंग असे दिव्यांग मध्ये मोडल्या जाणाऱ्या घटकास घरपोच कोव्हिड लस मिळावी यासाठी दिव्यांग संघटनेकडून आ. चिमणराव पाटील ,पारोळा न.पा व कुटीर रुग्णालयात निवेदन देऊन मागणी करण्यात आली. याबाबत संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले की, तालुक्यात 5 हजार तर शहरात दिव्यांग संख्या असून सदर वर्गास शारिरीक व्याधी मुळे प्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळे ते लसीकरण केंद्रापर्यंत पोहचू शकत नाही, त्यासाठी त्यांना घरपोच लस मिळावी या बाबत प्रशासनाने व्यवस्था करण्याची मागणी केली. सदर निवेदन त्यांनी आ चिमणराव पाटील ,न.पा व कुटीर रुग्णालयास दिले.यावेळी रवींद्र पाटील ,शशिकांत पाटील,सुरेश भोई,शिवाजी माळी ,राजेंद्र वाणी ,सचिन रोकडे ,कैलास लोहार आदी मूक बधिर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी शहर व तालुक्यातील मूक बधिर बांधवांची यादी पत्ते व दूरध्वनी सह दिली.

▶️ आमदार चिमणराव पाटील यांनी घेतली दखल –
या बाबत आ.चिमणराव पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन एरंडोल मतदार संघातील सर्व मूक बधिर ,दिव्यांगाना घरपोच लसीकरण मिळणे या बाबत आमदार चिमणराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र दिल्याचे रवींद्र पाटील व शशिकांत पाटील यांनी सांगितले.