लोण बु.येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

अमळनेर (प्रतिनिधी) लोण बु.येथे मुलभुत सुविधा 2515 अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, अंदाजित 14 लाख रुपये किंमत असलेल्या ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत याठिकाणी उपलब्ध होणार आहे. मतदारसंघात इतरत्र खोल्यांमध्ये असलेल्या ग्रामपंचायतींना आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून स्वतःच्या मालकीच्या इमारत सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन शासनाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरवणे त्यासाठीही योजना 2515 ही योजना सुरू करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी लोटनराव पाटील (लोण सीम) राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, मुडीचे युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव पाटील, लोण पंचमचे डॉ रामराव पाटील, वावडे येथील दीपक पाटील, किसन देवराम पाटील, खंडेराव पाटील, सुनील पाटील, विवेक पाटील, विकास शिंदे, लोण बुद्रुक सरपंच कैलास पाटील, उपसरपंच दिपक पाटील, सदस्य नाना पाटील, भटू संदानशिव, नाना पाटील, रवींद्र पाटील, उमेश पाटील, दीपक पाटील, सुशील शिंदे, अशोक पाटील, रवींद्र पाटील, ग्रामसेवक ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
