खान्देशी मराठा पुनर्विवाह व्हॉट्सअप गृप माध्यमातून पुनर्विवाहीतांना एक नवजीवनाचा सहारा!

चोपडा (प्रतिनिधी) आजपर्यंत फ्रेश विवाह गृप होते व फ्रेश विवाह होत होते, पण विधवा विधूर घटस्पोटीतांना आधार नव्हता व त्यामुळे जून्या काळी पूर्ण आयूष्य असेच निघून जात होते पण भास्करराव नानाजी पाटील, जानवेकर यांनी समाजात ह्या गोष्टी पाहून त्यांना जी ज्ञाशा झाली व त्यांनी महाराष्ट्रात प्रथमच व्हॉट्सअप गृप पुनर्विवाह हितासाठी तयार करू न एक अनोखा इतिहास निर्माण केला व त्यांना एक मायेचा आधार निर्माण झाला, आज त्यांचा सदर गृप महाराष्ट्रभर आहेच तसेच गुजरात व मध्यप्रदेशात ‘सुद्धा कार्यरत आहे, त्या माध्यमातून आजपर्यंत अनेक संबंध जमलेत व ते पहिल्या पेक्षा आनंदात संसार करीत आहेत.काही तर अपत्यासह लग्न जमलेत,खरोखर ह्याची जान ठेवून भास्करराव नानाजी पाटील जानवेकर मा.अधीक्षक जी.प.जळगांव यांना महाराष्ट्र राज्य आदर्श समाजरत्न पूरस्कार व राज्य मानव सेवा जीवन पूरस्काराने सन्मानीत केले. ह्या माध्यमातूनच आता त्यांची भाचीचा पुनर्विवाह झाला.
रवींद्र हिरामण पाटील खाचणे ता.चोपडा यांचे सुपुत्र निलेश यांचा गोकूळ देवचंद पाटील वलवन ता. नंदुरबार यांची सुकन्या अस्मीता हिच्याशी विवाह संपन्न झाला ,तरी या गृप साठी व समाजकार्य कामात मोलाची साथ त्यांची पत्नी शकूंतला ताई यांचदेखील मोलाची साथ लाभली.

पुनर्विवाहीतांनी या गृपचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन भास्करराव पाटील व सौ,शकुंतला पाटील यांनी केले आहे.संपर्कासाठी या 9420757677 नंबर वर फोन करावा