नाथाभाऊंना धक्का; ६ नगरसेवकांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील खडसे समर्थक असलेल्या 13 पैकी 6 नगरसेवकांचा शिवसेनेत वर्षा बंगल्यावर शिवसेना पक्ष प्रमूख तथा मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित प्रवेश झाला आहे. माजी आमदार एकनाथ खडसेंचे नेतृत्व नाकारत शहरात सुरु असलेल्या विकासकामांवरुन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाला पसंती दिली आहे. सहा नगरसेवकांनी खडसेंना रामराम केल्याने मुक्ताईनगर नगरपंचायतीत खडसे समर्थक अल्पमतात तर शिवसेना बहुमतात आली आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
शहराच्या विकासकामांवरुन सद्ध्या मुक्ताईनगर नगरपंचायत चर्चेत आहेत. खडसे समर्थकांपैकी एक गट विकासकामांचा विरोध तर दुसऱ्या गटाला विकासकामां आड राजकारण नको अश्या नगरसेवकांच्या मतांत विभिन्नता दिसून येत आहे. मुक्ताईनगर मध्ये खडसेंना डावलून आ.चंद्रकांत पाटील यांनी मंजूर करून आणलेल्या विकासकांमांना बहुमताने मंजुरी मिळाल्याने खडसे समर्थकांत फुट पडून दोन गट निर्माण झाली असल्याचा प्रकार नुकताच घडला आहे.
एकीकडे भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी आमदार एकनाथ खडसें सोबत मुक्ताईनगरच्या स्थानिक नगरसेवकांनी प्रवेश केला नव्हता. माजी आमदार खडसेंच्या माध्यमातून शहरात विकासकामे झाले नसल्याची खदखद त्यांच्या मनात होती. आमदार चंद्रकांत पाटील हे शहरात चांगल्या प्रकारे विकास कामे करत असल्याने कोणताही राजकीय भेदभाव ते करत नाही. परंतू, सत्ताधारी नगरसेवकांना हायकमांड कडून त्या कामांना विरोध करण्याचे सुचविले जात होते. हे काही नगरसेवकांना न पटल्याने त्यांनी खडसेंचे नेतृत्व अमान्य करत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाला पसंती दिली असल्याने खडसे समर्थक 6 नगरसेवकांनी रामराम ठोकत शिवसेनेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंंगल्यावर प्रवेश केला आहे. अजून काही नगरसेवक संपर्कात असून येत्या काही दिवसांत प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे.
▶️ अपात्रतेच्या भीतीमुळे प्रवेश- एकनाथराव खडसे
शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगरसेवकांना अपात्रतेची व गैरव्यवहार प्रकरणी कारवाई ची भीती सतावत असल्यामुळे त्यांनी प्रवेश केला असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी सांगितले. यातील एका नगरसेवकाला चार मुले, दोघांचे अतिक्रमण तर एका नगरसेवकाच्या जातीच्या दाखल्याच्या अडचणी आहेत. त्यांना अपात्रतेची भीती सतावत असून जिल्हाधिकाऱ्यांकडे 1 जून रोजी या प्रकरणातील सुनावणी होणार आहे. त्याचप्रमाणे नगराध्यक्षांना वारंवार त्रास देणे व गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नगरसेवकांच्या प्रवेशामुळे आपल्यावर कोणताही परिणाम होणार नसून, नगराध्यक्ष व आठ नगरसेवक आपल्यासोबत आहेत, असा दावा नाथाभाऊ यांनी केला.