यशस्विनी सामाजिक अभियान तर्फे अमळनेर येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन!

अमळनेर (प्रतिनिधी) खा.सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाने व यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन आज अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यशस्विनी सामाजिक अभियानाच्या जळगाव जिल्हा समन्वयिका व प्रियांका महिला विकास मंडळ, शिरूड च्या अध्यक्षा सौ तिलोत्तमा रवींद्र पाटील यांनी पैलाड, अमळनेर येथे हे शिवभोजन केंद्र सुरू केले आहे. कोरोना काळात टाळेबंदीचा विचार करता 14 जून 2021 पर्यंत दररोज 150 मोफत थाळ्यांचे वाटप या शिवभोजन केंद्राद्वारे गरीब व गरजू लोकांना करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, अनिल शिसोदे, जयवंत आबा, नगरसेवक संजय कौतिक पाटील, सुरेश पाटील, संजय पवार, संजय भिल, नितीन निळे, ज्ञानेश्वर पाटील, कैलास पाटील, चंदू परदेशी, सुरज परदेशी, वेदांशू पाटील आदी उपस्थित होते.
