राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा शहराध्यक्षपदी नूर खां पठाण यांची निवड

अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा या राष्ट्रीय पातळीवर सामाजिक कार्य करणाऱ्या संघटनेच्या जळगांव येथे झालेल्या बैठकीत अमळनेर शहराध्यक्ष म्हणून उच्चशिक्षित तथा सामाजिक भान असलेले कार्यकर्ते नूर खां मुक्तार पठाण यांच्या कार्याची दखल घेत मातृसंस्थाचे चे जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे यांनी त्यांची नियुक्ती केली, नूर पठाण यांच्या निवडी बद्दलराष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ शाकिर शेख यांनी सहमती दर्शवून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रीय किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत जगदाळे यांनी नूर पठाण यांना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होते ? हे पुस्तक देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.तर संघटनेचे राज्य सदस्य सुमित्र अहिरे, जिल्हा समीक्षक किशोर नरवाडे, प्रोटान या शिक्षक संघटनेचे जिल्हा महासचिव मिलिंद निकम, जिल्हा कोषाध्यक्ष विलास चिकने आदीनी पठाण यांना संघटन कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.