स्व.राजीव गांधी यांच्या सद्भावना दिनानिमित्त रुग्णांना मास्क व फळ वाटप!

पारोळा (प्रतिनिधी) येथे कुटीर रुग्णालयात सद्भावना दिवसानिमित्त भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांनी या देशासाठी आपले बलिदान याच दिवशी दिले म्हणून संपूर्ण भारतात 21 मे हा सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पारोळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वर्गीय राजीव गांधी यांना यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले. आधुनिक भारताचे जनक म्हणून जगात ओळख निर्माण करणारे राजीव गांधी यांनी आपल्या कार्यकाळात आधुनिक भारताची न्यू तंत्रज्ञान क्रांती जोपासून देशाला गतिमान व डिजिटल करण्याचे कार्य केले. तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले, यावेळी त्यांच्या प्रतिमेेला तालुका अध्यक्ष पिरन कुमार अनुष्ठान यांनी पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपाध्यक्ष संजय पाटील,छावाचे जिल्हा कार्याध्यक्ष दौलतराव पाटील, तालुका अध्यक्ष विजय पुना पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव महाजन,पुरुषोत्तम मुंडांकर, राजवड चे ईश्वर पाटील, अपंग सेलचे अध्यक्ष सुरेश भोई, अरुण पाटील म्हसवेकर शंकर वाघ,प्रकाश वानखेडे,कल्पेश पाटील,सुनील पाटील,दिलीप शिंदे, दिलीप पाटील विचखेडे, पारोळा कुठीर रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी योगेश साळुंखे,डॉक्टर जागृती पाटील डॉक्टर राजेश वालडे,परिचारिका सोनाली गुरव राखी बडगुजर,करूणा पवार,दिपक सोनार,आदी कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते