एसीपीएम मेडीकल कॉलेजमध्ये ग्राहक पंचायतीचे डॉ.योगेश सुर्यवंशी यांचे व्याख्यान संपन्न!

0

धुळे (प्रतिनिधी) जवाहर मेडीकल फाउंडेशनचे एसीपीएम मेडीकल कॉलेजमध्ये ग्राहक पंचायतीचे डॉ.योगेश हिंमतराव सुर्यवंशी यांचे ग्राहक संरक्षण कायदा 1986 आणि नवीन कायदा 2019 यावर डॉक्टर आणि ग्राहक कायदा या विषयावर व्याख्यान झाले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धुळे येथील जवाहर मेडीकल कॉलेज येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे सदस्य तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉ.योगेश सुर्यवंशी यांचे वैद्यकीय व्यवसाय आणि ग्राहक संरक्षण कायदा या विषयावर व्याख्यान झाले.ते म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा हा घटनेचे आर्टिकल 39 चे पोटकलम (ब)व (क) नुसार निर्माण झाला असला तरी घटनेचे आर्टिकल 19 आणि 21 ही या मध्ये समाविष्ट असल्याचा संदर्भ देत ते म्हटले की, जीविताच्या हक्कात आरोग्याचा हक्क समाविष्ट आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा पंजाब स्टेट वि महेंद्रसिंंग चावला 1997 च्या निकालाचा संदर्भ दिला.पूर्वी वैद्यकीय व्यवसाय हा सेवा म्हणून समजला जात होता,मात्र आज तो व्यवसाय झाला असल्याने डॉक्टरांना हा कायदा लागू झाला.या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा इंडियन मेडीकल कौन्सिल वि भारत सरकार या निकालामध्ये म्हटले आहे की,डॉक्टर आणि पेशंट यांचे नाते काॅन्ट्राक्टच्युअल (कंत्राटी)असल्याने डॉक्टरांना हा कायदा लागू आहे.तसेच या कायद्याचे कलम 2 चे पोटकलम (6)चे (1 )व( 3 ) नुसार अनफेअर कॉन्ट्रॅक्ट अँड अफेअर प्रॅक्ट्रीस (थोडक्यात अनुचित कंत्राट आणि अनुचित सेवा)जे देतील त्यांनाच ह्या कायद्याचे भय आहे.सरकारी रुग्णालयानाही हा कायदा लागू आहे .या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल पश्चिम बंगाल मजूर सोसायटी वि स्टेट ऑफ पश्चिम बंगाल.वैद्यकीय सेवा,मदत आणि उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर अशी सुविधा उपलब्ध न पुरवणारे शासकीय रुग्णालयांच्या बाबतीत जीविताच्या हक्काचे उल्लंघन केल्याचे समजण्यात येईल असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.जो जे शिकला आहे,त्याने तीच प्रॅक्ट्रीस केली पाहिजे .या बाबत सर्वोच्च न्यायालयाचा होमिओपॅथी डॉ.अश्विनी पटेल हिने पूनम वर्मा यांना अॅलोपॅथीचे इंजेक्शन दिल्याने पूनम वर्मा यांचा त्यात मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांनी डॉ.पटेल यांच्या विरोधात जिल्हा ग्राहक न्यायालयात दावा केला.तो डॉ.पटेल यांच्या विरोधात गेल्याने ते अपील करत थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचले.यात सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले की, तुम्ही जे शिकलेलेच नाहीत आणि तशी शासन, प्रशासन आणि कौन्सिलने ही परवानगी दिली नसल्याने वर्माचा प्राण गेला म्हणून या निकालात डॉ.अश्विनी पटेल यांना दहा लाखाचा दंड ठोठावला. रुग्णांचे उपचार संपल्यावर 72 तासाच्या आत ,तुम्ही सुचवलेल्या त्याने केलेल्या विविध चाचण्या ,त्याच्यावर केलेले औषधी किंवा सर्जरी उपचार आणि निदान ही सर्व कागदपत्र रुग्णास किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकांना परत केले पाहिजेत.असे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात आपले मत नोंदवले आहे.

त्याच प्रमाणे कोणताही डाॅक्टर त्याच्या हॉस्पीटलमध्ये किंवा दवाखान्यात आलेल्या रुग्णास त्याला चाचण्या आणि औषधी विशिष्ट ठिकाणावरूनच घ्यायचा आग्रह करता येणार नाही.त्याच प्रमाणे योग्य उपचार मिळण्याचा त्याला अधिकार देण्यात आला असून त्याच बरोबर त्याला दिलेल्या औषधी उपचारांनी त्यांच्या शरीरावर होणारे फायदे आणि तोटे(साईड इफेक्टस)या बाबत त्याला डॉक्टरांनी कल्पना द्यायला उपचारा दरम्यान त्याच्या जीवितास काही अपाय झाला किंवा त्यात चुकीचा उपचार किंवा उपचार दरम्यान हलगर्जी (मेडिकल निगलीजन्स) पणा केल्याने त्याचा मृत्यू झाल्यास त्याला किंवा त्याच्या नातेवाईकांना उपचार करणाऱ्या डॉक्टर किंवा हॉस्पीटलच्या विरोधात जिल्हा ग्राहक न्यायालयात दाद मागता येते.असे केल्यास तो या कायद्यानुसार अपराध मानण्यात येईल .पुढे सांगताना डॉ सूर्यवंशी म्हणाले की,काही डॉक्टर रुग्णांसोबत अनुचित प्रॅक्ट्रीसचा उपयोग करतात,त्यांना जरूर शिक्षा दिली पाहिजे.मात्र एकुणच सर्व डॉक्टरांची आणि वैद्यकीय व्यवसायाची मेडीया ट्रायल चालवणे गैर आहे. भारत सरकारने आणि राज्यसरकार यांनी रुग्णांना निर्मिती मूल्यात औषधी उपलब्ध करून दिली तर उपचार स्वस्त होवू शकतात असे आव्हान डॉ.योगेश सुर्यवंशी यांनी सरकारला केले.आणि शेवटी त्यांनी हेही सांगितले की,सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना एका निकालात असे ही सांगितले की, कोणत्याही डॉक्टरांचा रुग्णांना इजा पोहचवण्याचा उद्देश नसतो.तरीही डॉक्टरांनी आपल्या सेवा (प्रॅक्टिस) आणि व्यवसाय हा पारदर्शक ठेवतात आपल्या हॉस्पिटलच्या दर्शनी भागात माहिती अधिकार आदिनीयम 2005 चे कलम 4 चे पोटकलम (ख) थोडक्यात (सिटीजन चार्टर )चे अनुपालन केल्यास कोणत्याही वैधकीय व्यावसायिकाला ग्राहक संरक्षण कायद्याचा धाक बाळगण्याची गरज नाही असे डॉ. योगेश सूर्यवंशी यांनी शेवटी प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसीपीएम मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.विजय पाटील हे होते,तर कार्यक्रमाचे उदघाटक संस्थेच्या डॉ. ममता पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ .आरती महाले उपस्थित होत्या. सूत्र संचालन सहाय्यक मेडिकल सुप्रीडेंट डॉ.नितीन कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन मेडिकल कॉलेजचे मेडिकल सुप्रीडेंट डॉ.मधुकर पवार यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!