रासायनिक खतांची दरवाढ मागे घेण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी!

0

अमळनेर (प्रतिनिधी) मागील वर्षभरापासून राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला भाव मिळत नसुन,उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून दुप्पट हमी भाव देण्याची वलग्ना करणाऱ्या केंद्र सरकार कडुन भारतीय शेतीत युरिया नंतर मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या डायअमोनियम फॉस्फेट च्या ५० किलो खताच्या गोणीची किंमत १२०० रुपये वरून थेट १९०० रुपये करण्यात आली व यासह सर्वच रासायनिक खतांच्या किंमतीत तब्बल ५८% पेक्षा जास्त दरवाढ करण्यात आली असुन खरीप हंगाम तोंडावर असतांना सरकार कडुन शेतकऱ्यावर अन्याय केला जात आहे.केंद्र सरकारने खतांची दरवाढ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास संभाजी ब्रिगेड च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.यावेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक शाम पाटील,निनाद शिसोदे,राज सूर्यवंशी,सेनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील,यतीश पाटील,अमोल पाटील,संदीप पाटील उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!