शिरुड आरोग्य उपकेंद्रात 175 नागरिकांना लसीकरण!

अमळनेर (प्रतिनिधी) शिरुड (ता.अमळनेर) येथील नागरिकांनी गावातील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणा संबंधी मागणी केली होती. अखेर मागणी पूर्ण होऊन 175 नागरिकांना लसीकरण केले.व लसीकरण विकेंद्रीकरणा मुळे अनेक नागरिकांची पायपीट वाचली व अनेकांना याचा लाभ झाला व लसीकरण मोहीम सुरळीत पार पडली.
काही दिवसांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती श्याम आहिरे व बाजार समितीचे तज्ञ संचालक डी ए धनगर यांनी गावातील उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण व्हावे अशी मागणी केली होती. तसेच गावातील डी ए धनगर, सागर पाटील, अतुल सोनवणे व विनोद सोनवणे यांनी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांची भेट घेऊन आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र शिरुड या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसी टोचल्या जाव्यात अशी आग्रही मागणी केली होती. अखेर ती पूर्ण होऊन आज या उपकेंद्रात 175 नागरिकांना लसीकरण करण्यात आले याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. अनेक ज्येष्ठ नागरिक व अपंग बांधव यांना गावातल्याच मिळाल्यामुळे होणाऱ्या हालअपेष्टा थांबल्या तसेच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. लसीकरणासाठी डॉ. संजय रनाळकर, डॉ. भूषण भदाने, उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अतुल चौधरी, श्री चौधरी, गटप्रवर्तक सरिता मॅडम, आरोग्य सेविका अनिता पाटील, आरोग्य सेवक योगेश गावित, राकेश बागुल, एन डी शिंदे, अर्जुन लोखंडे यांनी मदत केली. सरपंच गोविंदा सोनवणे, शशिकांत पाटील, दिनेश पाटील, प्रफुल्ल पाटील, सागर पाटील, पोलीस पाटील विश्वास महाजन, आनंदा सोनवणे, ग्रामसेवक सूर्यवंशी, भाऊसाहेब पाटील, कल्पेश महाजन आदी उपस्थित होते.