डॉ.उस्मान पटेल यांना हिंदुस्तान रत्न गोल्डन हार्ट अवार्ड!

पारोळा (प्रतिनिधी) येथील गजानन विद्या मंदिर शाळेचे उपक्रमशील शिक्षक डॉ. उस्मान फकीरा पटेल यांना बेंगलोर कडून हिंदुस्तान रत्न गोल्डन हार्ट अवार्ड 2021 देऊन सन्मानित करण्यात आले.गोल्डन केअर क्लब चेअरमन सुधाकर के यांनी पुरस्काराची घोषणा केली. दरवर्षी सामाजिक शैक्षणिक पर्यावरण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्रातून डॉ.पटेल यांना पुरस्कार बहाल करण्यात आला. सर्वत्र अभिनंदन होत आहे.