प्रा.भूषण पाटील यांचे संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारची पेटंटची मान्यता

शिरपूर (प्रतिनिधी) आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉमम्युनिकेशन विभागातील प्रा . भूषण वामनराव पाटील यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकार ची पेटंट म्हणून मान्यता मिळाली असून हे संशोधन कोणत्याही रुग्णाची वैद्यकीय तपासणी ही डॉक्टर सल्लामसलत करण्यापूर्वी सध्याच्या आर्टीफिसिअल इंटेलिजन्स आधारित प्रणालीशी संबंधित आहे,तरी या स्वयंचलित प्रणाली द्वारे आर्टिफिसिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने रुग्णाची वैद्यकीय चाचणीच्या रिपोर्ट आधारे संबंधित आजाराचा परिणाम समजू शकतो. ह्या विकसित प्रणाली मध्ये आपण एखाद्या पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सोबत इंटरनेट किंवा वाय – फाय कनेक्शनच्या मदतीने सॉफ्टवेअर अनुप्रयोगासह स्थापित केले आहे.यामध्ये रुग्णाच्या पूर्वीच्या आरोग्य नोंदी ह्या थेट वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक डेटाबेसशी जोडलेले आहेत. त्यानुसार एखादी व्यक्ती नियमितपणे वैद्यकीय चाचण्या करू शकते आणि आरोग्याच्या नोंदी स्वयंचलितपणे डेटाबेसमध्ये आणि कृत्रिमरित्या जतन केल्या जाऊ शकतात.या आर्टीफिसिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या उपयोग निदान चाचण्यांच्या परिणामाचे स्वयंचलितपणे अर्थ लावण्यासाठी केला जाऊ शकतो.या संशोधनाचा आजच्या युगात वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचा बदल घडून आणू शकतो , जे कोणत्याही रुग्णाच्या आरोग्याच्या नोंदींमध्ये असामान्य असलेल्या मापदंडांना समजू शकतो,रुग्णाच्या उच्च किंवा असामान्यपणे कमी जास्त होणाऱ्या पॅरामीटर्सचा परिणाम रुग्णाला ऑडिओ टीपद्वारे त्याचा परिणाम समजू शकतो.प्रा . भूषण पाटील ह्यांना ह्या पेटंटसाठी महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या आधुनिक लॅबचा ही उपयोग झाला असून येणाऱ्या काळात या पेटंटच्या साहाय्याने रुग्णाच्या वैद्यकीय तपासण्यानुसार होणाऱ्या आजाराची सुरुवातीलाच कल्पना येऊ शकते व वैद्यकीय क्षेत्रात एक महत्वाचा बदल घडून येऊ शकतो.प्रा.भूषण पाटील यांना त्यांच्या या संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकार ची पेटंट म्हणून मान्यता मिळाली, त्यासाठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रमोद देवरे यांचे ही मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या यशाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ.जे बी पाटील,जनसंपर्क अधिकारी डॉ . प्रशांत महाजन व सर्व विभागप्रमुख यांनी अभिनंदन केले आहे .