पारोळा कृ.उ.बा.समितीला चाळीसगांव कृ.उ.बा.समितीच्या प्रशासकीय संचालक मंडळाची भेट!

पारोळा (प्रतिनिधी) येथील कृषि उत्पन्न बाजार समितीला चाळीसगांव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय संचालक मंडळ,व्यापारी व हमाल-मापाडींनी भेट दिली. यावेळी प्रशासक मंडळ,व्यापारी व हमाल-मापाडींनी पारोळा बाजार समितीचे सद्यस्थितीचे कामकाज बघितले.यासोबतच आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सभापती अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी उभारलेल्या पारोळा कृषि उत्पन्न बाजार समिती संचलित हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरची पाहणी केली. या कोविड केअर सेंटरमधील सोयी-सुविधा, रूग्णांसाठी केलेल्या व्यवस्था हे सर्व बघून उपस्थित चाळीसगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक, व्यापारी बांधव, हमाल-मापाडी यांनी कौतुक करत रूग्णांप्रती व मतदारसंघाप्रती असलेली तळमळ बघुन आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच असेच सेवाकार्य सदैव आपल्या हातुन घडत राहो यासाठी सभापती पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील, पारोळा बाजार समितीचे संचालक राजु मराठे, पारोळा बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी, चाळीसगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय संचालक अनिल बापु, अशोक खलाणे साहेब, संजय ठाकरे, मधुकर कडवे, व्यापारी स्वप्निलशेठ, रविंद्र आण्णा,टिणुशेठ व हमाल मापाडी बांधव उपस्थित होते.
