ज्ञानेश्वर जाधव यांची देशमुख मराठा समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी निवड!

भडगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवणी येथील ज्ञानेश्वर बबनराव जाधव यांची देशमुख मराठा समाज महासंघ उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली त्यांनी समाजात बरेच मुलामुलींचे लग्न जमवले व देशमुख मराठा समाजाला एकत्र करण्याचे काम जाधव यांनी केले आहे.जाधव हे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष,अखिल भारतीय युवक मराठा महासंघ व देशमुख समाज युवा जागृती मंडळ महाराष्ट्र व आई फाऊंडेशन महाराष्ट्र कार्याध्यक्ष व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आरोग्य फॉउंडेशन संचालक या पदावर जाधव काम करतात व लॉक डाउन काळात जाधव यांनी गरिबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. गरीब कुटुंबाला खूप मदत केली.त्यांच्या निवडीबद्दल सर्व समाज कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.