अमळनेरला मातृदिनी गरजू कलावंतांना किराणा मालाचे किट वाटप

अमळनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषद जळगाव यांचे वतीने उद्या 9 मे या मातृदिनाच्या औचित्य साधत येथील सानेगुरुजी शाळेच्या प्रांगणात सकाळी नऊ वाजून 45 मिनिटांनी गरजू कलावंतांना किराणा मालाचे किट वितरीत करण्यात येणार आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते नाट्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य रंगकर्मी संदीप घोरपडे, प्रा.अशोक पवार व बन्सीलाल भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहील. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते नाट्य परिषद व तमाशा परिषद जिल्हाभरातील कलावंतांचा शोध घेऊन त्या गरजू कलावंतांना किराणा मालाचे कीट प्रदान करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील नाट्यकलावंत तमाशा कलावंत व सादरीकरणातून उपजीविका करणारे इतर कलावंत यांना कोरोना महामारी च्या काळात मदत करण्यासाठी जिल्हाभरातील अनेक दाते दानशूर व्यक्ती यांच्या सहकार्याने हे वितरण केले जाणार आहे,असे नाट्य परिषदेचे अध्यक्ष रोहिणीताई खडसे ,अ भा तमाशा परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शेषराव नाना गोपाळ व शाहिरी परिषदेचे व तमाशा परिषदेचे मुख्य संघटक विनोद ढगे यांनी कळविले आहे.