श्री दीप रक्तसेवा व संजीवनी मेडीकल यांच्या तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

▶️ कोरोना काळात रक्तदात्यांनी केले रक्तदान
पारोळा (प्रतिनिधी) येथील श्री दीप रक्त सेवा ग्रुप धुळे व संजीवनी मेडिकल पारोळा यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन 08 मे रोजी संजीवनी मेडीकल चोरवड रोड या ठिकाणी आयोजीत करण्यात आले होते.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रक्तपेढीतील रक्तसाठा दिवसेंदिवस अत्यल्प होत असतांना संजीवनी मेडीकलचे संचालक संदीप माने(पाटील),कृषीरत्न श्री मल्हार कुंभार पारोळा, शहर तलाठी निशिकांत माने(पाटील) व श्रीकृष्ण युवा गृप यांनी यांनी रक्तदान शिबीर आयोजीत करून रक्तसाठ्यात वाढ करण्यात खारीचा वाटा उचलला.सदर शिबीरास तहसिलदार अनिल गवांदे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.सदर शिबीरात एकुण 46 रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबीरास श्रीकृष्ण युवा गृप चोरवड रोड यांचे सहकार्य लाभले.
