शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी अमळनेरला घेतला आढावा

अमळनेर(प्रतिनिधी) कोरोनाच्या स्थितीत दिवसागणिक जिल्ह्याची स्थिती सुधारत असली तरी अलर्ट मात्र कायम आहे.याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालय(DCHC) व इंदिरा भुवन येथील कोविड हेल्थ सेन्टर येथील रुगांना देखील देऊन प्रशासन व आरोग्य व्यवस्थेच्या कामाचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी अमळनेरच्या संपूर्ण व्यवस्थेचे कौतुक केले तसेच परिस्थितीत जरी सुधारणा दिसत असली तरी अलर्ट राहूनच काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
प्रांत कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी शहरी तसेच ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची माहिती घेतली,जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वर भर देत रुग्णांची शोध मोहीम हाती घेऊन चाचणी कराव्यात,गृह विलगकीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिल्याने संसर्गाचे प्रमाण आपोआप कमी करता येईल.
प्राथमिक टप्प्यात रुग्ण शोधल्याने होणाऱ्या मृत्यचे प्रमाण थांबवता येईल.तसेच नागरिकांनी लक्षणे दिसतात चाचणी करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.यावेळी प्रांत सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद वाघ,ग्रामीण चे डॉ.प्रकाश ताडे,नगरपरिषदेचे डॉ.विलास महाजन डॉ.राजेंद्र शेलकर,डॉ.आशिष पाटील नगरपरिषदेचे संजय चौधरी उपस्थित होते.