प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

शनिवार, 24 एप्रिल 2021
▶️ सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2016 पासून सातवा वेतन आयोगाचा मिळणार लाभ; सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय
▶️ कोविड-19 लढ्यात भारतीय रेल्वेची महत्वाची कामगिरी; पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात झाली दाखल
▶️ फ्रान्स काल दुपारी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले; पॅरिस येथे दहशतवाद्यांनी थेट पोलिस ठाण्यात घुसखोरी करून महिला पोलिस अधिकारीचा चिरला गळा, पॅरिसच्या सर्व सीमा बंद तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश!
▶️ 1 मे पर्यंत राज्यात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू राहणार बँका; पैसे काढणे आणि भरणे एवढेच व्यवहार राहणार सुरू, कोरोना पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय
▶️ कोरोनासंदर्भातील पंतप्रधानांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल बोलताना तो संवाद रेकॉर्ड केला जात होता. ही बाब लक्षात येताच पंतप्रधानांनी केली केजरीवालांची कानउघाडणी; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर केजरीवालांना मागावी लागली हात जोडून माफी
▶️ महाराष्ट्राची लाडकी चित्रपट वाहिनी झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांसाठी करणार ‘छू मंतर’ हा खास हॉरर कॉमेडी फिल्म फेस्टिवल सादर; 26 एप्रिल पासून संध्याकाळी 7 वाजता असणार विनोदी चित्रपटांची मेजवानी
▶️ कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या अनुषंगाने कॅनडा कडून भारत आणि पाकिस्तानच्या विमानांना येत्या 30 दिवसांसाठी बंदी
▶️ ब्रिटीशांची शान असलेले आयकॉनिक कंट्री क्लब स्टोक पार्क हे मुकेश अंबानी यांच्या मालकीचे होणार; कराराची रक्कम 624 कोटी इतकी असल्याची चर्चा!
▶️“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीनं कोणालाही सोडलं नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत,” म्हणत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा भारताला मदतीचा हात